Maharashtra State Wrestling Association | भारतीय कुस्ती संघटनेचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त; शरद पवारांना धक्का

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra State Wrestling Association | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त (Maharashtra State Wrestling Association) करण्यात आली आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांना एक धक्का मानला जात आहे. याबाबत निर्णय भारतीय कुस्ती संघटनेने (Indian Wrestling Association) घेतला आहे. महासंघाच्या सुचनांनुसार 15 आणि 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीचा (Maharashtra State Wrestling Association) निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान, पुढील काही दिवसामध्ये हंगामी समितीची निवड होईल अशी माहिती समोर येत आहे. जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती पुढे येत आहे.

 

भाजपचे खासदार बृजभुषण सिंग (BJP MP Brijbhushan Singh) हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच विनोद तोमर (Vinod Tomar) हे सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे (Babasaheb Landage) हे 40 वर्षांहून जादा काळ सचिव आहेत. बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांआधी पुण्यात पैलवानांनी आंदोलनही केले होते. याबाबत भारतीय कुस्ती महासंघाकडे तक्रारही केली होती. यानंतर आता या बरखास्ती नंतर नव्यानं निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद तयार करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मार्फत केले जातेय.

 

Web Title :- Maharashtra State Wrestling Association | maharashtra state wrestling
association dismissed action of indian wrestling association NCP Chief Sharad Pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा