Maharashtra Strict Restriction | डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Strict Restriction | देशात थैमान घातलेली कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) ओसरत असतानाच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta plus variant) डोक वर काढले आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळले आहेत. यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 21 रुग्ण आहेत. तसेच राज्यातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. त्यामुळे डेल्टा प्लसचा धोका पाहता अन् कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू (Restrictions Across The States ) करण्याचा निर्णय राज्य मंत्रिडळाच्या (State Cabinet) बैठकीत घेण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

ठाकरे सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या 5 टप्प्यातील पद्धतीत बदल केला जाणार आहे. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांत अधिक कठोरता आणून अत्यावश्यक दुकान वगळता इतर दुकानांच्या वेळा कमी करण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात याबाबतची नियमावली राज्य सरकार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकारने काही दिवसापूर्वी अनलॉकचा निर्णय घेतला होता.

मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्राने राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणे हे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या 3- 4 आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Maharashtra Strict Restriction | delta plus variant threat maharashtra back to strict restriction state cabinet meeting

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद