जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Suspended PSI Arrest In Dacoity | महाराष्ट्र पोलिस दलातून (Maharashtra Police) निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने (Police Sub Inspector) बापाला आणि पाहुण्याला हाताशी धरून जळगावातील कालिंका माता मंदिराशेजारील स्टेट बँक ऑफ इंडियावर (Jalgaon SBI) दरोड्याचा घाट घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव पोलिसांनी संशयित पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या बापाला आणि पाहुण्याला अटक केली आहे. पोलिसांनी रोख 16 लाखासह 3 कोटी 60 लाखांचे सोने जप्त केले आहे. (Maharashtra Suspended PSI Arrest In Dacoity)
संशयित निलंबीत पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक Shankar Ramesh Jasak (रा. कर्जत), रमेश राजाराम जासक Ramesh Rajaram Jasak (रा. मन्यारखेडा) आणि जासकचा पाहुणा व बँकेतील ऑफिस बॉय मनोज रमेश सुर्यवंशी (Manoj Ramesh Suryavanshi) अशी त्यांची नावे आहेत. शंकर जासक हा ऑक्टोबर 2021 पासून कामावरून गायब होता. गुरूवारी (दि. 1 जून) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हेल्मेट परिधान केलेल्या चोरटयांनी बँकेमध्ये मागच्या दरवाजातून प्रवेश केला होता. त्यांनी ऑफीस बॉय मनोज सुर्यवंशी आणि सुरक्षारक्षक संजय बोखारे यांच्या डोळयात स्प्रे मारून तसेच त्यांना मारहाण करून त्यांना बांधून ठेवले होते. इतरांना चाकूचा धाक (Robbery In Jalgaon) दाखवून मारहाण करीत एका ठिकाणी बसवले होते. त्यांनी बँकेतून 17 लाख आणि 3 कोटी 60 लाख रूपये किंमतीचे सोने लंपास केले होते. (Maharashtra Suspended PSI Arrest In Dacoity)
घडलेल्या गंभीर घटनेची दखल पोलिस अधीक्षक एम. राजकुमार (IPS M Rajkumar) यांनी घेतली
आणि युध्दपातळीवर तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. पोलिसांच्या तपासादरम्यान बँक मॅनेजर (Bank Manager SBI)
आणि ऑफीस बॉय मनोज सुर्यवंशी यांच्याकडे वेगवेगळी विचारपूस केली असता त्यांच्या जबाबामध्ये कमालीचा फरक जाणवला.
त्यानंतर पोलिसांनी मनोज सुर्यवंशीकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरील उद्योग हा
मुहेणा शंकर जासक (Suspended PSI Shankar Jasak) आणि त्याचा बाप रमेश जासक यांनी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी जासक बाप-लेकाला अटक केली आहे.
Web Title : Maharashtra Suspended PSI Arrest In Dacoity | Jalgaon: Suspended police sub-inspector (PSI)
held hands with father and guest in robbery at State Bank (SBI) in Jalgaon
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Chhagan Bhujbal | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का?, छगन भुजबळ म्हणाले- ‘त्यांच्या मनात दु:ख आहे, त्या…’
- Palkhi Sohala 2023 | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा
- Ajit Pawar | विधानसभा तिकीट वाटपाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले-‘जो लोकसभा निवडणुकीत…’