‘या’ कारणामुळं तानाजी सावंतांची मंत्रीपदाची ‘संधी’ हुकली, राजकीय वर्तुळात चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. परंतु काही दिग्गज नेत्यांना शिवसेनेकडून डावलण्यात आले. तानाजी सावंत हे प्रबळ दावेदार असूनही त्यांना मंत्रिमंडळविस्तारात शिवसेनेकडून संधी मिळाली नाही. सावंत तसे वादग्रस्त राहिले आहेत. युती सरकार असताना मंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ तसा वादग्रस्त राहिला आहे. त्यांच्या राजकीय विधानामुळे त्यांची मंत्रिपदाची मोठी संधी हुकली अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तानाजी सावंत युती सरकारच्या काळात जलसंधारण मंत्री होते, तेव्हा त्यांच्या कार्यकाळात तिवरे धरणं फुटलं होतं. याकारणाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर सावंत यांनी अजब प्रतिक्रिया दिली होती की खेकड्यांच्या पोखरल्यामुळे धरण फुटले असावे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर महोद्य चांगलेच ट्रोल झाले. मग संतापलेल्या लोकांनी प्रश्नांची सरबती सुरु केली, लोक विचारायला लागले की आता काय खेकड्यांवर गुन्हा दाखल करायचा का? त्यांची ही प्रतिक्रिया सावंतांच्या पुढील वाटचालीत अडचणीची ठरेल हे जवळपास निश्चित झाले होते.

या व्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्राला भिकेला लावेल असेही वादग्रस्त विधान चर्चेत राहिले होते. त्यामुळे विरोधकांसह लोकामधून देखील त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

सावंत यांच्यावर शिवसेनेने निवडणूकीपूर्वी मोठी जबाबदारी टाकली होती. पक्षातील अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देखील मिळवून दिली, परंतु रश्मी बागल यांच्यापेक्षा 20 हजार मते जास्त मिळवून नारायण पाटलांनी विजय मिळवला. त्यामुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले. त्याचा देखील परिणाम सावंतांच्या मंत्रिपदावर झाला की खेकड्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना डावलण्यात आले हे अद्याप तरी स्पष्ट नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा