शिक्षकांसाठी वाईट बातमी ! जनगणनेसाठी मे महिन्यातील सुट्ट्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जनगणनेमुळे शिक्षकांना मे मधील सुट्ट्यांना मुकावे लागणार आहे. जनगणनेसाठी मोठ्या संख्येने शिक्षकांच्या नेमणूका करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या रद्द होणार आहेत. जनगणना अधिकाऱ्यांकडून या संबंधित सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकामध्ये नाराजीचा सूर आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या परिषदेकडून होत आहे.

2021 च्या जनगणनेसाठी 1 मे 2020 ते 15 जून 2020 या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरु होईल. यात घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी, घर यादी तयार करणे इत्यादी कामे करण्यात येतील. त्यासाठी शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. या कारणाने शिक्षकांच्या रजा रद्द केल्या जाणार आहेत. मे महिन्यातील सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षातील 76 पैकी 39 सुट्यांना मुकावे लागेल.

या निर्णयावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या निर्णयाचा निषेध करण्यात आला असून हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

जनगणनेच्या नोटीसमध्ये नक्की काय –
जनगणनेचा पहिला टप्पा 1 मे ते 15 जून दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीत शिक्षकांना अनेक कामे करावी लागतील. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महापालिका आणि खासगी शाळेतील शिक्षक तसेच मुख्याधापकांना मुख्यालय सोडून जाऊ नये अशा सूचना नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत. मुख्यालय सोडून गेल्यास मुख्यधापकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबईतील कार्यवाह शिवनाथ दराडे म्हणाले की, कोणत्याही कामासाठी शिक्षकच का नेमावे लागतात. त्यांच्या सुट्यांवर गदा का आणली जाते. इतर कर्मचाऱ्यांकडे हे काम का सोपवले जात नाही. आम्ही जनगणना अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्टा रद्द करु नयेत अशी मागणी करणार आहोत. त्या कालावधीत शिक्षकांना कुटूंबासह बाहेर जावे लागते. तर काही शिक्षकांना बोर्डचे पेपर तपासण्याची कामे असतात असे ही त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like