Maharashtra Temperature | महाराष्ट्रात पुढील आठवडा थंडीचा; ग्रामीण भागांत दिसू लागले स्वेटर, शाली, गमछे

मुंबई / नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Temperature | तामिळनाडू आणि आसपासच्या भागात पावसाने (Rain) थैमान घातले असले तरी, देशाच्या काही भागात थंडीचे (Cold) प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात तर पुढील आठवडा हा फक्त थंडीचा (Maharashtra Temperature) राहणार आहे. पिकांसाठी हे वातावरण चांगले असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सध्या पडत असलेल्या थंडीचा फायदा रब्बी पिके, उन्हाळ पेर व लागवड केलेल्या कांद्याना होणार आहे. तसेच चालू असलेल्या उन्हाळ कांदा लागवडीला नजीकच्या काळात वातावरणाचा कोणताही अडथळा जाणवणार नाही. पुढील आठवड्यात मुंबईसह (Mumbai) उपनगरी भागात किमान तापमान (Maharashtra Temperature) 13-14 डिग्री पर्यंत तर कमाल तापमान 26-27 डिग्रीपर्यंत घट येऊन चांगली थंडी जाणवू शकते.

हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांच्या माहितीनुसार, ‘पुढील आठवड्यात केवळ महाराष्ट्रच (Maharashtra) नव्हे तर गुजरात (Gujarat), पश्चिम मध्य प्रदेश (West Madhya Pradesh) राज्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल. त्याच बरोबर संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट व दाट धुके तर सकलच्यावेळी खालावलेली दृश्यता असे वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रात चांगलीच थंडी जाणवू शकते.

देशाच्या वायव्य तसेच उत्तरेतील अनेक भागात थंडीचा कहर दिसून येत आहे.
शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या पालम भागात तापमान 4 अंशाच्या आसपास होते.
सफदरजंग भागातही तापमान 10 अंश होते.
हीच स्थिती उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाबमध्ये होती.
काश्मीर, हिमाचल प्रदेंश आणि उत्तराखंडात तर सध्या बर्फवृष्टी आहे.
एकूणच महाराष्ट्रातील थंडी सुसह्य असून ही थंडी गुलाबी अशीच म्हणावी लागेल.
या गुलाबी थंडीमुळे ग्रामीण भागांत स्वेटर, शाली, गमछे दिसत असले तरी मुंबईसारख्या शहरात मात्र फारच किरकोळ थंडी आहे.

Web Title : Maharashtra Temperature | no rain no hail just cold now maharashtra india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalna Crime | विवाहितेची 4 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या; जालना जिल्ह्यातील घटना

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या