Maharashtra Temperature | महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढणार – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Temperature | मार्च महिन्याला (March) सुरुवात झाली तशी राज्यात उन्हाचा चटका वाढला. तेव्हापासून राज्यातील तापमानात (Maharashtra Temperature) अधिकतर वाढ होऊन महाराष्ट्रवासियांना कडक उन्हाची झळ सोसावी लागत आहे. अशातच आता एप्रिल महिन्यामध्ये (April) देखील उन्हाचा जोर वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) देण्यात आली आहे.

 

राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) येथे यंदा पाऊसही (Rain) अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात तापमानात वाढ पाहण्यास मिळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल असाही अंदाज वर्तवला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), विदर्भ (Vidarbha), कोकण (Konkan), तसेच मराठवाड्याती (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद केली जाऊ शकते. असं सांगण्यात येत आहे. (Maharashtra temperature)

 

दरम्यान, गेल्या वर्षांपेक्षा जादा तापमान यंदा एप्रिल महिन्यामध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळू शकेल. त्याचबरोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात यंदा पाऊस (Rain) जादा असण्याबरोबरच सरासरीपेक्षा याचे प्रमाण जादा असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Temperature | Summer in Maharashtra will increase in April Indian Meteorological Department (IMD)

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा