राज्यातील ‘TET’ परिक्षेच्या तारखा जाहीर, अर्ज करण्याची अंतिम ‘ही’ तारीख, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षक पात्रता परिक्षेच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही परिक्षा जवळपास 2 वर्षांच्या कालावधीनंतर आयोजित करण्यात आली आहे. पुढील वर्षी 2020 मध्ये जानेवारी महिन्यात ही परिक्षा असेल. महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एग्जामिनेशनने परिक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

वेळापत्रकानुसार परिक्षा 19 जानेवारी 2020 ला आयोजित करण्यात आली आहे. पेपर – 1 आणि पेपर – 2 या दोन्ही परिक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर आहे.

राज्यात सरकारी किंवा खासगी शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा पास होणे अनिवार्य आहे. यावर्षी परिक्षेच्या आराखड्यात बदल करण्यात येणार आहेत. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनी दोन परिक्षा देणे आवश्यक आहे. राईट टू एजुकेशन अ‍ॅक्टनुसार शिक्षकांना ही परिक्षा पास होणे अनिवार्य आहे.

15 जुलै 2018 नंतर कोणतीही परिक्षा आयोजित करण्यात आली नाही. परिक्षेचे प्रवेशपत्र 4 जानेवारी 2020 ला जारी करण्यात येईल. 4 ते 19 जानेवारीपर्यंत उमेदवार वेबसाइटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

पहिला पेपर सकाळी 10.30 वाजता दुपारी 1 वाजेपर्यंत असेल. तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 पर्यंत असेल. याशिवाय अतिरिक्त माहिती https://mahatet.in/ या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. नोटिफिकेशन वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like