Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Thane Police | मुंब्रा विभागात राहणाऱ्या एका खेळणी व्यापाऱ्याकडून सहा कोटी रुपये लुटण्याच्या प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्त जगजीत सिंग (CP Jagjit Singh) यांनी धडाकेबाज निर्णय (Thane Police) घेतला आहे. एकाच दिवशी मुंब्रा पोलीस स्थानकातील (Mumbra Police Station) तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांना निलंबित (Police Officers Suspended) करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे ठाणे पोलिस दलात (Thane City Police Force) मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra Thane Police)

 

याप्रकरणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Senior Police Inspector) आणि या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) त्याचबरोबर निलंबित झालेल्या सर्वांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देखील पोलीस आयुक्त जगजीत सिंग यांनी काढले आहेत. ही चौकशी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (DCP Avinash Ambure) करणार आहेत. (Maharashtra Thane Police)

 

चौकशीदरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे (Mumbra Police Station) 10 कर्मचारी सकृतदर्शनी दोषी आढळल्याचा अहवाल उपायुक्त अंबुरे यांनी दिला आहे. त्यानंतर आज पोलीस आयुक्त सिंह यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे (Police Inspector Gitaram Shewale), पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे (PSI Harshad Kale), रविराज मदने (Raviraj Madane) यांच्यासह पोलीस नाईक पंकज गायकर (Police Naik Pankaj Gaikar), जगदिश गावीत (Jagdish Gavit), दिलीप किरपण (Dilip Kirpan), प्रवीण कुंभार (Praveen Kumbhar), अंकुश वैद्य (Ankush Vaidya), पोलीस शिपाई ललित महाजन (Lalit Mahajan), नीलेश साळुंखे (Nilesh Salunkhe) यांना तत्काळ निलंबित केले आहे.

 

पोलीस आयुक्त सिंह यांनी सांगितलं की, याप्रकरणी परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे (ACP Venkat Andhale), मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग (Senior PI Ashok Kadlag) यांचेही जबाब नोंदवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

 

नेमकं प्रकरण काय?

12 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी (Bombay Colony) भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन (Faisal Memon) यांच्या घरी बोगस धाड टाकून मेमन यांच्या घरातून 30 बॉक्स जप्त केले. या प्रत्येक बॉक्समध्ये 1 कोटी याप्रमाणे 30 बॉक्समध्ये 30 कोटींची रोकड होती. हे 30 कोटींचे 30 बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्याचे पीआय (गुन्हे) गीताराम शेवाळे (PI Gitaram Shewale), पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे (PSI Harshad Kale), रविराज मदने (Raviraj Madane) यांनी साक्षीदारांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. हे बॉक्स मध्यरात्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मेमन यांना दमदाटी करुन पोलिसांनी 6 बॉक्स ठाण्यात ठेवले बाकी 24 बॉक्स मेमन यांना परत दिले.

 

ही रोकड मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अशोक कडलग यांच्या केबिनमध्ये मोजण्यात आली.
ही ‘तोडबाजी’ केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) हे प्रकरण दाबलं.
मात्र याप्रकरणी सर्व माहिती इब्राहिम शेख (Ibrahim Sheikh)
नामक एका व्यक्तीने गृहखात्याला पत्र लिहून दिली.
त्यानंतर एक वृत्तांतही सीसीटीव्ही फुटेज सह समोर आलं आहे.
त्यामुळे ठाणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Maharashtra Thane Police | Maharashtra Thane Police Seven Policeman And
Three Police Officers Are Suspended Thane Police 10 Suspended At Mumbra Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा