Corona Vaccine : ‘कोविशिल्ड’ लसीचे 1.5 लाख डोस मुंबईतून भुतानला रवाना

मुंबई : देशभरात शनिवारी कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झाल्यानंतर आता शेजारील मित्र देशांना कोविशिल्ड देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी कोविशिल्डचे दीड लाख डोस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भुतानमधील थिम्फुकडे रवाना करण्यात आली. भारताकडून भेट म्हणून हे डोस पाठविण्यात आले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमधून खास गाडीतून रात्री हे डोस मुंबईला रवाना करण्यात आले होते. स्पाईस जेटच्या विमानातून ही कोविशिल्डचे डोस भूतानला रवाना झाले.

 

 

 

 

 

 

केंद्र सरकारने यापूर्वी सिरम इन्स्टिट्युटला परदेशात कोविशिल्ड लस निर्यात करण्यास बंदी घातली होती. मात्र, भारतातील लसीकरण मोहिमेसाठी लागणार्‍या आवश्यक तेवढ्या लसीचे डोस उपलब्ध असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारील देशांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मालदीव, बांगला देश, नेपाळ या शेजारील देशांना कोविशिल्डचे डोस पाठविण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.