Coronavirus : चिंताजनक ! पुण्यातील ‘कोरोना’बाधित रुग्णांचा आकडा 10 हजार पार, आतापर्यंत 422 जणांचा बळी

पुणे : मुंबई खालोखाल ठाणे व आता पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची १० हजाराहून अधिक झाली आहे. मंगळवारी रात्री पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजार ९५९ होती. त्यात पुणे शहर ८ हजार २९६, पिंपरी चिंचवड ८१५ आणि पुणे ग्रामीण ३५१, पुणे कॅटोंमेंट आणि जिल्हा रुग्णालये ४९७ रुग्णांचा समावेश होता. रात्री उशीरा आलेल्या अहवालामध्ये ५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १० हजार १२ इतकी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 422 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.

शहरातील १८९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी ३९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या ५ हजार ३०४ इतकी झाली आहे.