Maharashtra to Karnataka travel rules Latest | महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍यांची रॅपिड टेस्ट घेण्यास सुरुवात

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रातील (Maharashtra) वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक (Karnataka) शासनाने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा (Maharashtra Karnataka Interstate Boundary) असलेल्या कोगनोळी या ठिकाणी प्रवाशांची रॅपिड एंटीजन टेस्ट (Rapid antigen test) करण्यास सुरुवात केली आहे. Maharashtra to Karnataka travel rules Latest | Rapid test started for those going to Karnataka from Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यापूर्वी कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र (Corona negative certificate) सक्तीचे करण्यात आले होते. ते नसेल तर लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता प्रवाशांनी केली नसल्यास त्यांची येथे तात्काळ रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात येत आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्या प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जातो. चाचणीत प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

रविवारी दिवसभरात ४० प्रवाशांची रॅपिड एंटिजन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश देण्यात आला.

Web Title : Maharashtra to Karnataka travel rules Latest | Rapid test started for those going to Karnataka from Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक