Maharashtra Universities Exam : सर्व विद्यापीठांनी 7 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षासाठीच्या परीक्षेचं वेळापत्रक सादर करावं : महाराष्ट्र सरकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या लास्ट ईयर / सेमीस्टरच्या परीक्षा घेण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यातील सर्व विद्यापीठांना कोरोना महामारी दरम्यानच फायनल ईयरच्या परीक्षा घेण्यासंबंधी एक विस्तृत योजना 7 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, फायनल ईयरच्या परिक्षा आयोजित करण्यासंबंधात सोमवारपर्यंत सर्व विद्यापीठांना सविस्तर शेड्यूल द्यावे लागेल. सर्व विद्यापीठांकडून शेड्यूल मिळाल्यानंतर सरकार आपत्ती व्यवस्थापन समितीसोबत बैठक घेवून हे ठरवेल की, परीक्षेच्या दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोण-कोणती पावले उचलली पाहिजेत.

महाराष्ट्र सरकारने रद्द केल्या होत्या परीक्षा
महाराष्ट्र सरकारने राज्यात कोरोनाचा कहर खुपच वाढला असल्याने या परीक्षा रद्द केल्या होत्या. परंतु, त्याचवेळी फायनल ईयरच्या परीक्षांबाबत सुप्रीमकोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकाला आता परिक्षांची तयारी करावी लागत आहे.

सुप्रीमकोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, सर्व राज्यांना विद्यापीठ आणि कॉलेजच्या फायनल ईयरच्या परीक्षा आयोजित कराव्या लागतील आणि कोणतेही विद्यापीठ किंवा कॉलेज परीक्षेशिवााय लास्ट ईयरच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाही.