Maharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत (second wave) मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने (State Government) लॉकडाऊनसह इतर कडक निर्बंध लागू केले. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यातील लॉकडाऊन आणि निर्बंध शिथल (Maharashtra Unlock) करण्यची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण (Corona patient) कमी आहेत. ‘त्या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: हटवण्याची (Maharashtra Unlock) शक्यता आहे.

Maharashtra Unlock | 14 districts to get relief from lockdown

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या घटली (districts with lower corona cases) आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण दर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: संपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असे 14 जिल्हे (14 districts) असून त्याची यादी राज्याच्या आरोग्य विभागाने (Health Department ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे सादर केली आहे.

हे आहेत निकष

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सलग तीन आठवडे 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच उद्योजकता वाढावी, यासाठी हा निर्णय घेतला जावा, असा दावा आरोग्य मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या जिल्ह्यांची यादी लवकरच निश्चित केली जाईल आणि ती जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक

पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे (heavy rain) पूरस्थिती (Flood) निर्माण झाली.
यामुळे कोरोनाचे संकट अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यात
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत गेली. 18 ते
24 जुलैच्या कालावधीमध्ये सांगलीत कोरोनाचा दर 9.1 टक्के एवढा आहे. त्याखालोखाल सातारा
8.2, सिंधुदुर्ग 8, पुणे 7.4, कोल्हापूर 6.3 तर अहमदनगर 6.2 अशी नोंद करण्यात आली आहे.

मुंबईचा दर 2.3 टक्के

मुंबईमध्ये कोरोनाचा दर 2.3 टक्के आहे. यामुळे मुंबईतील लोकल (Local) सेवा पुन्हा सुरु
करण्याचा पुनर्विचार सुरु असल्याचे चित्र आहे. परंतु ज्या भागात कोरोना रुग्ण वाढीचा दर सलग
तीन आठवडे 1 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. अशा ठिकाणी लॉकडाऊन पूर्णत: शिथिल
होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Money Laundering Case | मनी लॉड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या आमदाराला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Kirloskar Brothers | किर्लोस्कर बंधूंच्या कंपन्यांमध्ये 130 वर्षांच्या वारशावरून वाद; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Unlock | 14 districts to get relief from lockdown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update