Maharashtra Unlock | व्यावसायिकांना मोठा दिलासा ! राज्यात 15 ऑगस्टपासून मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार सुरु; पण मल्टिप्लेक्स, मंदिरे अन् प्रार्थनास्थळे बंदच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Unlock | गेल्या काही महिन्यापासून बंद असलेला महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होत आहे. मागील काही महिन्यापासून अनेक आस्थापना बंद होत्या. तर काही ठिकाणी शिथिलथा दिली असली तरी तेथे वेळ देखील कमी होती. त्यामुळे व्यावसायिकांना आपला व्यवसाय करायचा कसा? हा मुळात प्रश्न उभा होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) याला हिरवा कंदील (Maharashtra Unlock) दिला आहे. राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स 15 ऑगस्टपासून दररोज रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे आता व्यावसायिकांना एक दिलासा मिळाला आहे.

याचबरोबर, मंगल कार्यालये, इनडोअर खेळ यांना देखील परवानगी दिली गेली आहे. परंतु, मंदिरे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स हे स्थळे बंद राहणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या (State Government) मंत्रिमंडळाने बुधवारी (11 ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. स्वातंत्र्यदिनापासून अनेक निर्बंधातून मुक्ती राज्य सरकारने दिली आहे.

Immunity Boost | मान्सूनमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी तुळस आणि काळीमिरी काढ्याचे करा सेवन, जाणून घ्या ‘हे’ 10 फायदे

पुढे बोलताना टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आणि तिसरी लाट सुरू होताच ज्या दिवशी रुग्णांना 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी संपूर्ण राज्यात आहे त्या स्थितीत लॉकडाऊन लावून पुन्हा निर्बंध लागू केले जातील. असं ते म्हणाले. राज्यात सध्या उद्योगांकडून 1500 ते 1600 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उत्पादित केला जातोय. तसेच, राज्यात 450 PSA प्लांट उभारण्यात येत आहेत. त्यामधील 141 प्लांट सुरू झालेत. आगामी महिन्यात आणखी 200 प्लांट कार्यान्वित होतील. सर्व PSA प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर राज्यात दररोज 400 ते 500 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होणार आहे.

काय सुरु राहणार?

– सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू

– हॉटेल, रेस्टॉरंट 50 % क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

– दुकान, मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीकरण आवश्यक.

– शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश

– मंगल कार्यालयांना 50 % क्षमतेत जास्तीत जास्त 100 नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी

– खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांच्या उपस्थितीस मुभा

– खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या 24 तास सुरू ठेवता येणार

– बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी

– जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा 50 % क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

– राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहणार.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण, जाणून घ्या मुख्य शहरातील सोन्याचा भाव

Toll GPS System | टोल प्लाझावरून जाणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 3 महिन्यात सुरू होणार तुमच्यासाठी नवीन सुविधा; जाणून घ्या

Raj Kundra Pornography Case | शर्लिन चोपडाने शेयर केला राज कुंद्रासोबतच्या पहिल्या शूटचा फोटो, म्हणाली – ‘माझ्यासाठी नवा अनुभव होता’

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Maharashtra Unlock | exemption restrictions independence day malls shops hotels bars start ups temples places worship

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update