Maharashtra Unlock | निर्बंध शिथिल होणार ?, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona second wave) राज्यात थैमान घातले होते. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याचे चित्र आहे. राज्यात नवीन रुग्णांच्या (New patient) संख्येत मोठी घट झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) वाढले आहे. याशिवाय राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने (State Government) एप्रिलमध्ये कडक निर्बंध (Strict restrictions) लागू केले होते. परंतु आता रुग्ण कमी होत असल्याने निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) केले जात आहेत. तर काही जिल्ह्यामध्ये निर्बंध पूर्णपणे हटवण्यात (Maharashtra Unlock) आले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध (district list published)
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची (third wave) भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्याबाबत आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतला आहे. यानुसार निर्बंध शिथिल करण्याबाबत जिल्ह्याचे पाच गटांमध्ये वर्गीकरण (Classification into five groups) केलं जात आहे. प्रत्येक आठवड्याच्या निकषानुसार (Weekly criteria) जिल्ह्यांची यादी जाहीर (List release) केली जाते. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Police Property Cell । विविध चोरीच्या घटनांमध्ये मुंबईतील महिलेलाआतापर्यंत 50 वेळा अटक

असे केले जाते वर्गीकरण (Details of Classification)
कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध (Maharashtra Unlock) हटवण्यासंदर्भात पाच गट तयार केले आहेत. पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची (Oxygen bed) संख्या यानुसार या जिल्ह्यांचे वर्गीकरण (Classification of districts) केलं जातं. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे (Order) सर्वात कमी पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी (total unlock of restrictions allowed) आहे. तर ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध वाढवण्याचे निर्देश (ncrease restrictions) दिले आहेत.

पहिल्या गटातील जिल्हे (कंसात पॉझिटिव्हीटी रेट टक्क्यांमध्ये)
भंडारा (0.96), औरंगाबाद (2.94), अमरावती (1.97), अकोला (4.97), बुलडाणा (2.98), अकोला (4.97), चंद्रपूर (0.62), गोंदिया (0.27), गडचिरोली (3.53), धुळे (2.42), हिंगोली (1.93), जळगाव (0.95), जालना (1.51), नागपूर (1.25), नांदेड (1.94), लातूर (2.55), मुंबई (3.79), नाशिक (4.39), वर्धा (1.12), परभणी (0.94), सोलापूर (3.73), ठाणे (4.69), वाशिम (2.79), यवतमाळ (3.79)

पहिल्या गटात नसलेले जिल्हे (कंसात पॉझिटिव्हीटी रेट टक्क्यांमध्ये)
पुणे (9.88), रायगड (12.77), कोल्हापूर (13.77), उस्मानाबाद (5.21), बीड (7.11), पालघर (5.18), रत्नागिरी (11.90), सातारा (8.91), सांगली (8.10), सिंधुदुर्ग (9.06), यवतमाळ (5.24)
पहिल्या गटात काय सुरु होणार ? (First group Unlock details)

पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारची दुकाने पुर्ववत सुरु होतील.
मॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह (Malls, theaters, multiplexes) देखील नियमितपणे सुरु होतील.
रेस्टॉरंट (Restaurant) सुरु करण्यास परवानगी असेल.
लोकल सेवा पुर्ववत होईल, परंतु स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास (Local Disaster Management Department) निर्बंध घालण्याची मुभा असेल.
सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली (Public places, grounds open) राहतील,
वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी (Permission for walking and cycling) असेल.
खाजगी कार्यालये सुरु करण्यास मुभा, शासकीय कार्यालये 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभी असेल.
लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील.
जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर (Gym, salon, beauty parlor, spa, wellness centers) यांना परवानगी असेल.
सार्वजनिक वाहतूक सेवा (Transportation service) पूर्ववत राहील. तसेच जमावबंदी नसेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web title : maharashtra unlock guidelines latest news maharashtra unlock guidelines new restriction rules

हे देखील वाचा

धक्कादायक ! पोटच्या 6 दिवसाच्या बाळाला पालकांनीच 3.6 लाखांना विकलं, 6 जणांना अटक

arrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई