Maharashtra Unlock | महाराष्ट्र ‘Unlock’ करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्वाचं विधान; म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेने नागरिकांना भयभीत करून टाकलं आहे. मात्र हे संकट ओसरत जाताना दिसत आहे. असं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील निर्बंध जैसे थे ठेवले आहे. मात्र राज्य अनलॉक (Maharashtra Unlock) कधी होणार? आणि मुंबईतील लोकल कधी सुरु होणार? असा अनेक विषयावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) माहिती दिली आहे. मुख्यतः म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करण्याची आवश्यकता असल्याचं राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं आहे.

 

काय म्हणाले राजेश टोपे?

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल, हे आपल्यावर आहे. जर आपण करोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला कोरोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण (Vaccine) देखील रामबाण उपाय आहे असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम लागू केले आहेत. त्यांच्या नियमानुसारच महाराष्ट्र राज्य काम करत आहे. आयसीएमआरने सिरो सर्व्हे (Siro Survey) केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल, या बाबत सुचना द्याव्यात. कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्यानुसारच नियम पाळत आहोत. आयसीएमआरने (ICMR) मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल असं टोपे (Rajesh Tope) म्हणाले,

पुढे बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले,
‘आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत.
विमानतळावर निगेटीव्ह रिपोर्ट (Negative report) असल्याशिवाय परवानगी नसायची,
आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना मुंबईत प्रवेश दिला जाणार आहे.
असं ते म्हणाले, तर कदाचीत रेल्वेजवळ तेवढं मनुष्यबळ नसेल.
एवढ्या गर्दीत प्रवाशांची तपासनी होईल का, असा प्रश्न निर्माण होतो.
म्हणून अजून तरी लोकलबाबत निर्णय झालेला नसेल.
परंतु 2 लस (Vaccine) घेतल्याना अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत.
या विचारांच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही. म्हणून मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील, असं देखील टोपे यांनी सांगितलं आहे.

Web Title :- Maharashtra Unlock | Health Minister rajesh tope big statement regarding relaxation of restrictions said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला