Maharashtra Unlock | ‘महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोनावरील निर्बंध हटणार पण…’ – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Unlock | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे (Coronavirus) सावट कमी झाले आहे. त्यामुळे सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 1 एप्रिलपासून करोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे (Coronavirus Restrictions Update) घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. (Maharashtra Unlock)

 

1 एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क (Mask) वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं देखील राजेश टोपेंनी सांगितलं. त्याचबरोबर यावेळी लसीकरणाच्या (Vaccination) बाबतीत चलढकल नको, प्रत्येकाने आपलं लसीकरण करून घेणं आवश्यक आहे. अशा सूचना देखील राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. (Maharashtra Unlock)

 

दरम्यान, नागरिकांकडून सतत रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या आल्या.
त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात आला असून 1 एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत.
पण मास्क सक्ती मात्र कायम असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Unlock | health minister rajesh tope informed that there is no restriction of corona in the state from 1 april

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा