Maharashtra Unlock : नव्या नियमावलीनुसार E-Pass संदर्भातही मोठे बदल, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील जिल्ह्यांची district कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार वर्गवारी करून अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. हि घोषणा करतानाच इ पासच्या नियमांध्येही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना district दिलासा तर काही जिल्ह्यांत जैसे थे परिस्थिती आहे. खासगी गाड्या, टॅक्सी किंवा बसने लांबचा प्रवास करण्यासंदर्भातील नियमांमध्ये झालेला हा बदल आणि हे स्तर नक्की काय आहेत जाणून घेऊयात.

अशा पद्धतीने होणार जिल्ह्यांची विभागणी
पहिला गट : ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत.
त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.
दुसरा गट : पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.
तिसरा गट : पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत.
असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.
चौथा गट : पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत.
असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.
पाचवा गट : पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत.
असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

ई – पासचे नवे नियम काय आहेत ?
पहिल्या गटातील जिल्ह्यामध्ये प्रवास करताना इ – पासची आवश्यकता भासणार नाही.
परंतु पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांमधून जर पाचव्या गटातील म्हणजे संसर्गाचा धोका अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असल्याच ई – पासची गरज लागणार आहे.
दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांनाही हाच नियम लागू आहे.
थोडक्यात संसर्गाचा धोका अधिक असलेल्या जिल्ह्यांमधून प्रवास करायचा असल्याच ई – पास आवश्यक असणार आहे.
पाचव्या गटातील जिल्ह्यांमध्ये ई – पासची सक्ती कायम राहणार आहे.
या जिल्ह्यातील व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी काही विशेष कारणांसाठीच सवलत दिली जाणार आहे.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ