Maharashtra Unlock | महाराष्ट्र लवकरच होणार ‘अनलॉक’? CM उद्धव ठाकरेंनी आरोग्य मंत्रालयाकडून मागितला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Unlock | राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) निर्बंध ‘जैसे थे’ ठेवले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक होती त्यामुळे सर्वत्र निर्बंध कायम ठेवले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. तसेच राज्यात येत असल्याने कोरोना लसीकरणाची (Vaccination) गती देखील वाढवली आहे. त्यामुळे राज्यात अधिकचा धोका टळलेला असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यातील (Maharashtra Unlock) निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याच्या विचारात आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) सल्ला मागवला असल्याची माहिती समोर आलीय. आगामी काळात लवकरच राज्यात अनलॉकची पुन्हा प्रक्रिया सुरु होणार असल्याचे समजते.

Maharashtra Unlock | maharashtra government will consider opening restrictions covid 19 cm seeks suggestions from health ministry

आता राज्यात सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. म्हणून या वेळांमध्ये बदल केला जाऊ शकतो. याचप्रमाणे सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकलनं प्रवास करण्यास मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांकडून सातत्याने लोकल सुरु करण्याची मागणी होतेय. यावरून या निर्बंधामध्ये देखील सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) सल्ल्यानुसार, छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. दुकानांची वेळ वाढवली जाऊ शकते. तसंच काही अटींसह मुंबई लोकलमध्येही सामान्य नागरिकांना सूट देण्याबाबत विचार केला जाऊ शकणार आहे. यावरून आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आज याबाबत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. यावरून राज्य सरकार राज्यातील निर्बंधाबाबत निर्णय घेणार आहेत.

या दरम्यान, राज्यात रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे जून महिन्यात एकूण 5 स्तरात अनलॉक
(Maharashtra unlock in 5 levels) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या
स्तरानुसार कोरोना पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या
आधारावरच हे निर्बंध शिथील करण्यात येतात. दर आठवड्याला यामध्ये जिल्ह्यानुसार बदल होत
असतात. परंतु आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरोग्य
मंत्रालयाकडून सल्ला मागविला आहे. त्यानुसार राज्यातील निर्बंध कशा पद्धतीने शिथिल केले
जातील. ते ठरणार आहे.

हे देखील वाचा

Parambir singh | परमबीर सिंग यांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SIT ची नेमणूक; 2 DCP, 2 ACP अन् महिला PI च्या अडचणी वाढ?

Police Officer Transfer | मुंबईतील पोलिस उपायुक्त पठाण व मणेरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील व शिंदे आणि मपोनि आशा कोरके यांची बदली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Unlock | maharashtra government will consider opening restrictions covid 19 cm seeks suggestions from health ministry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update