Maharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार? आज आदेश जारी होण्याची दाट शक्यता

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Maharashtra Unlock । राज्यात मागील दोन, तीन महिन्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होती. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाला होता. सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (State Government) राज्यातील लागू केलेले निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करणार का? याच निर्णयाकडे राज्यातील सर्व नागरिकांचे लक्ष आहे. तर याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील निर्बंधाबाबत टास्क फोर्स, आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

दोन दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी निर्बंध शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (29 जुलै) रोजी महत्वाची बैठक झाली. यामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याविषयी चर्चा झाली आहे. असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यातील 25 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) कमी आहे. या 25 जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात टास्क फोर्सने देखील सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. यावरून आता याबाबतचा आदेश देखील तयार झाला आहे. फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची स्वाक्षरी राहिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे शुक्रवारी पूरग्रस्त दौर्‍यावर असल्याने या तयार झालेल्या आदेशावर त्यांची सही झाली नाही.
यामुळे आज मुख्यमंत्र्यांची सही होऊन तो आदेश जरुरी केला जाण्याची शक्यता आहे.
तसेच, या आदेशाप्रमाणे 1ऑगस्टपासून महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) कमी असलेल्या 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.
यामध्ये दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत चालू खुली ठेवण्याची मुभा दिली जाणार आहे.
तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्स 50 टक्के नुसार सुरू ठेवण्याची मुभा दिली जाणार आहे.
याबाबत माहिती एका वृत्तानुसार समजते.

 

त्याचबरोबर, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे नेट सरासरी पेक्षा जास्त असल्याने तेथील कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाही. परंतु, अन्य जिल्ह्यात जे निर्बंध स्तर 3 चे आहेत.
त्याबाबत आरोग्य विभागामार्फत (Department of Health) सूचना मुख्यमंत्र्याना केल्या आहेत.
2 डोस झालेल्यांना रेल्वेनं प्रवास करता येऊ शकतं का याची चाचपणी सुरु आहे.
मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री रेल्वे विभागाशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत.
तसेच, राज्यात लसीकरण गतीने होत आहे. अर्थचक्रही चाललं पाहिजे म्हणून निर्बंध शिथील होतील.
राज्य तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे.
तिसरी लाट येऊ नये असं वाटतंय, पण आलीच तर सरकारने मुबलक तयारी करुन ठेवली
असल्याची माहिती राजेश टोपे यांनी (Health Minister Rajesh Tope) दिली आहे.

 

Web Title : Maharashtra Unlock | maharashtra unlock restrictions will be reduced 25 districts state where number corona patients low

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | अण्णा भाऊंची शाहिरी म्हणजे तळपती तलवार – दिलीप वळसे पाटील

Pune Traffic Police | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल

Flood Affected Area | राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचं सुमारे 1800 कोटींचं नुकसान