Maharashtra Unlock | आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले – ‘दिवाळीनंतर एका डोसवर मुक्त संचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात (Maharashtra Unlock) आली आहे. आता महाराष्ट्र हळूहळू पूर्णपणे अनलॉक (Maharashtra Unlock) होत आहे. राज्यातील शाळा, मंदिर सुरु झाल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एका लसीच्या डोसवर (vaccine One dose) मुक्त संचार करता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री (CM) दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. दिवाळीत कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन लोकांना होणाऱ्या या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या (task force) सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय (Maharashtra Unlock) घेणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले, आत्ताच दसरा झाला, दिवाळी येतेय. संपूर्ण सणामध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंदिरं, थिएटर्स उघडली आहेत. आत कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी येत आहे. या पार्श्वक्षूमीवर निर्णय होईल. संख्या आटोक्यात राहिली तर सवलत (Maharashtra Unlock) मिळेल. आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये (aarogya setu app) जर ‘सेफ’ अस स्टेटस आल्यास सवलती मिळू शकतील. राज्यामध्ये दिवाळीनंतरच्या कोरोना आकडेवारी नंतर आरोग्य विभागाशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे टोपे यांनी सांगितले.

 

तर असा निर्णय

राज्यात मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी (Heard immunity) आलेली असेल आणि टास्क फोर्स,
आरोग्य विभागाची (Health Department) सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कोविशील्डच्या (Covishield) पहिल्या डोसानंतर 84 दिवसांचा कालावधी दुसऱ्या डोससाठी दिला आहे.
त्यामुळे मोठं अंतर असल्याने असुविधा होते. त्यामुळे आरोग्याची बाब लक्षात घेऊन (Maharashtra Unlock) यावर निर्णय होईल, असंही टोपे म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Unlock | maharashtra unlock total relaxation after one dose of corona vaccine after diwali 2021 rajesh tope says cm uddhav thackeray will take decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | ‘मी मोठी नेता नाही पण….’ ! एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत म्हणणाऱ्या शरद पवारांना पंकजा मुंडेंनी दिलं चोख उत्तर

Aadhaar Services | आता पोस्टमनद्वारे करू शकता आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट; इंडियन पोस्ट पेमेंट बँक देतंय सुविधा, जाणून घ्या

Tonsillitis Home Remedies | टॉन्सिल इन्फेक्शन त्रास देत असेल तर ‘या’ 7 उपायांनी घशाच्या वेदनांपासून होईल सुटका