Maharashtra Unlock | राज्य अनलॉक होणार? टास्क फोर्ससोबत CM ची बैठक, डॉक्टरांनी मांडलं ‘हे’ मत, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आल्यानंतर राज्यात निबंध लागू करण्यात आले आहेत. आता राज्यातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तर काही जिल्ह्यात रुग्णांची संख्या अद्यापही वाढत आहे. एकूणच महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहेत. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करण्याची मागणी होत आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी टास्क फोर्सच्या (Task Force) डॉक्टरांची बैठक घेतली. यावेळी टास्क फोर्स मधील डॉक्टरांनी राज्यातील निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करण्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.

15 ऑगस्टपर्यंत अंदाज घ्यावा

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये टास्क फोर्समधील काही डॉक्टरांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, राज्यातील निर्बंध एकदम शिथिल न करता ते हळूहळू शिथिल करण्यात यावेत. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे तेथे शिथिलता करु नये, असं मत या डॉक्टरांनी मांडले. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत सर्व अंदाज घ्यावा आणि त्यानंतर संपूर्ण निर्बंध शिथिल (Maharashtra restrictions relaxation) करायचे की नाही याबाबत विचार करा, असेही काही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

तिसऱ्या लाटेचा धोका

राज्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. परंतु, याच दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (third wave) येण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे संपूर्ण निर्बंध शिथिल केल्यास तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण निर्बंध एकदम शिथिल न करता ते हळूहळू शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे.

लोकल संदर्भात काय निर्णय ?

राज्यात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबईत देखील रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
त्यामुळे मुंबईची लाइफलाइन (Mumbai Lifeline) असलेल्या लोकल ट्रेन (Local train) सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्याची मागणी प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.
मुंबई आणि आसपासच्या उपनगरात रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे.
त्यामुळे नागरिक आणि प्रवासी संघटनांच्या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title : Maharashtra Unlock | maharashtra unlock updates task force committee doctors give this suggestion to cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MP Sanjay Raut | UP मध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत ‘शिवसेना’ स्वबळावर लढणार

Pune-Nashik Railway | पुणे-नाशिक रेल्वेने मार्गाने पकडली गती; 12 पैकी 7 गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण

IIT Bombay Recruitment 2021 | मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘या’ पदांसाठी लवकरच भरती