Maharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, पुण्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Maharashtra Unlock । कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं होतं. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. त्या जिल्ह्यात मात्र हे निर्बंध असेच राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे, तिथे आम्ही करतो आहोत. जिथे करणं थोडसं अवघड आहे, तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं होतं. यावरून आता राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, उर्वरित 11 जिल्ह्यात स्तर 3 चे निर्बंध असणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे.

आताच्या नव्या नियमावलीनुसार (New regulations) सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत.
या अनलॉकच्या (Unlock) नव्या निर्णयाकडे राज्यातील नागरिकांचं आणि व्यापाऱ्याचं अधिक लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास 25 जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे.
मात्र, राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये स्तर 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे.

 

 

 

या नव्या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
मात्र, यासाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे.
शिवाय, वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे.
तसेच, रविवारी केवळ अत्यावश्यस सेवेची दुकानेच सुरु राहतील.
तर, धार्मिकस्थळ उघडण्यास अजून मुभा देण्यात आलेली नसून,
राज्यभरात धार्मकस्थळं ही बंदच असणार आहे.

या दरम्यान, सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
फक्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.
तसेच, वॉकिंग सायकलिंग आणि एक्ससाइजसाठी गार्डन्स मैदाने उघडे राहतील.

 

Web Title : maharashtra unlock new rules announced restrictions in 11 districts including pune and satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक

Digital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय RBI, जाणून घ्या नोटांपेक्षा किती असेल वेगळी, काय होणार सामान्य लोकांना फायदा

Viral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण, खेकडयाने डायरेक्ट धरला प्रायव्हेट पार्ट; पुढं झालं असं काही….(व्हिडीओ)