Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यात होणार अनलॉक, मात्र पुण्यात लॉकडाऊन; जाणून घ्या कारण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अनलॉकची विभागणी पाच टप्प्यात करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स 25 टक्के व्यापलले आहेत. अशा जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक Unlock करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याचा समावेश लेव्हल पाचमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात 5 टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्य टप्प्यात 18, दुसऱ्या टप्प्यात 5, तिसऱ्या टप्प्यात 10 आणि चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा सहभाग आहे. पण, पुण्यात मात्र, लॉकडाऊन कायम असणार आहे.

यामुळे पुण्यात लॉकडाऊन कायम
पुण्यात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट (Positivity rate) 6.5 टक्के आहे. 80 टक्के ऑक्सिजन बेड्स रिकामे आहेत. परंतु अजूनही 900 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या जवळपास आहे. पुणे ग्रामीणचा सरारसरी पॉझिटिव्हिटी रेट पुणे शहरापेक्षा जास्त आहे. पुणे जिल्हा लेव्हल पाचचे निकष पूर्ण करायला अजून आठवडा जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील जिल्हे
भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ

दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर

चौथा टप्पा – पुणे, रायगड

अनलॉककचे पाच स्तर कोणते ?
पहिला स्तर –
पूर्णपणे अनलॉक, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरा स्तर – मर्यादित स्वरुपात अनलॉक, Unlock पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के, ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्के व्यापलेले असावेत.

तिसरा स्तर – निर्बंधासह अनलॉक, पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा, ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यपलेले असतील

चौथा स्तर – निर्बंध कायम, पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल, तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील.

पाचवा स्तर – रेड झोन, पूर्णपणे लॉककडाऊन, पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यंपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

 

पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु होणार
– रेस्टॉरंट, मॉल्स
– खासगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरु होतील
– थिएटर सुरु होतील
– गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरु होतील
– चित्रपट शूटिंगला परवानगी
– सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट
– पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
– ई-कॉमर्स सुरु राहिल
– जिम, सलून सुरु राहणार
– बस 100 टक्के क्षमतेने
– आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल
– इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

 

दुसऱ्या टप्प्यात काय सुरु राहणार ?
– 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट
– सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रेक पूर्ण सुरु राहील
– मॉल्स, थिएटर्स 50 टक्के, लोकल ट्रेन सुरु राहणार नाही
– ई सेवा सुरु राहील
– बांधकाम पूर्ण सुरु, कृषी कामे
– बसेस बैठक क्षमतेने
– जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के
– जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लाँग ट्रेन, खासगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी आहे.
मात्र पाचव्या टप्प्यात जाण्यासाठी ई पास आवश्यक

 

तिसऱ्या टप्यात काय ?
– अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
– इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 (शनिवार-रविवार बंद)

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे