Maharashtra Unlock | तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘देऊळ बंद’च अन् सिनेमागृहाचे दार देखील, राज्य सरकार ठाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यात लागू केलेले निर्बध शिथिल (Maharashtra Unlock) करण्यात आले आहेत. आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (Cabinet meeting) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करण्यावर चर्चा झाली. यानुसार आता 15 ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल (Hotel) रेस्टॉरंट (restaurant), मॉल्सलाही (mall) रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र धार्मिक स्थळं (Temples) आणि सिनेमागृह (Cinema Halls) बंदच राहणार आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. राज्यातील हॉटेल्स आणि मॉल्स सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली मंदिरे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे. तसेच सिनेमागृह देखील बंद राहणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

 

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

लोकल ट्रेनमध्ये दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवास करता येणार आहे. मासिक आणि त्रैमासिक पास असणार आहे. बळजबरीने प्रवास केला तर 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु करण्यास परवानगी, उपहार गृहांना 50 टक्के आसनावर मान्याता. वेटिंगमध्ये असणाऱ्या ग्राहकांना मास्क अनिवार्य असेल. वेटर आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेणे आवश्यक.

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये लस देण्यास प्राधान्य देणार. खासगी कार्यालये 24 तास सुरु राहतील.

इनडोअर स्पोर्टसला मान्यता देण्यात आली आहे.

शॉपिंग मॉल 10 पर्यंत सुरु राहतील, मात्र, दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल.

शाळा आणि कॉलेजच्या बाबतीत शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स बाबत मुख्यमंत्री बैठक घेतील.
त्यानंतर अंतिम निर्णय होईल.
कुलगुरु यांच्याकडून अहवाल घेतल्यानंतर कॉलेजच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल.
शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

Web Title :- Maharashtra Unlock | temples cinema halls will remain closed state government decision

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BHR Scam | बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात सुनील झंवरला 10 दिवसांची दिवस कोठडी

Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला इशारा, म्हणाले – ‘…त्या दिवशी संपूर्ण राज्यात कठोर लॉकडाऊन लागू केला जाईल’

Online Banking | ‘या’ 7 ऑनलाइन धोकादायक बनावट बँकिंग लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, सरकारने सुद्धा केले सावध; जाणून घ्या डिटेल