Maharashtra Unlock | 18 वर्षाखालील मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी, मॉल्समध्ये खुशाल फिरा, नवीन नियमावली जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्या कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) आल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, आता कोरोनाची दुसीर लाट ओसरत असल्याने राज्यात लागू केलेले निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करण्यात आले आहेत. राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करताना काही अटी घातल्या आहेत. राज्यातील सर्व मॉल (Malls) रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु ज्यांनी लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांनाच मॉलमध्ये परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता 18 वर्षाखालील मुला-मुलींना (under 18 children) या अटीमधून वगळण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून ब्रेक द चेन (Break the chain) म्हणत राज्यात स्वातंत्र्य दिनापासून (Independence Day) म्हणजेच 15 ऑगस्ट पासून राज्यात अनलॉक जाहीर केले आहे. आता नवीन नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील दुकानं आणि मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

नवीन नियमावली नुसार, मॉल्समध्ये प्रवेशासाठी ज्या व्यक्तीने लसीचे दोन डोस घेतले आहेत. अशांना परवानगी देण्यात आली होती. पण अद्याप 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण (Vaccination) सुरु झाले नाही. त्यामुळे 18 वयोगटाखालील मुला-मुलींना मॉल्समध्ये बिनधास्तपणे फिरता येणार आहे. फक्त ओळखपत्र म्हणून आधारकार्ड (Aadhaar card), पॅनकार्ड (PAN card) किंवा शाळा महाविद्यालयाचे ओळपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. त्यामुळे 18 वयोगटाखालील मुला-मुलींना मॉल्सचे दार आता पुर्णपणे खुले झाले आहे.

Web Title :- maharashtra unlock under 18 children will not have rules in malls rules have changed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना इशारा, म्हणाले – ‘… तर तुमची पोलखोल करणार’

BHR Scam | कर्जाची 20% टक्के रक्कम 10 दिवसांत भरण्याचे न्यायालयाचे आदेश; भाजप आमदार चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Eatable Vaccine | हे असेल भविष्य…! व्हॅक्सीन-औषधांसाठी डॉक्टर सांगतील तुम्हाला वनस्पतींची नावे!