
Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Unseasonal Rain | राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 7, 2023
मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे, यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 7, 2023
आधीच पिकांना भाव नाही, त्यातच अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) हजेरी लावली.
त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाने शेताती उभी पिक भुईसपाट झाली आहेत.
गंगापूर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. गहू, हरबरा, पिके आडवी झाली आहेत. तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात कापसांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
Web Title : Maharashtra Unseasonal Rain | cm eknath shinde order panchnama of farmers crops damaged due to unseasonal rain
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Sanjay Raut | जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान