Maharashtra Vidhan Parishad Election 2021 | ‘वा..वा मिटकरी लैच बोलायला लागले’; चंद्रकांत पाटलांचा अमोल मिटकरींना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदांच्या निवडणूक निकालानंतर (Maharashtra Vidhan Parishad Election 2021) भाजप आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola)-बुलढाणा (Buldhana)-वाशिम (Washim) विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election 2021) भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवला. भाजपने महाविकास आघाडीची मते फोडली, भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप होत असताना भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी भाजपच्या विजयाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तर ईव्हीएम मशीन (EVM machine) चांगलं असतं, आसाममध्ये भाजप जिंकले तर ईव्हीएम मशीनमध्ये प्रॉब्लेम, हे जिंकले तर तत्वज्ञान जिंकतं आणि आम्ही जिंकलो तर घोडेबाजार जिंकला असा तर्क देतात असे म्हणत आम्ही घोडेबाजार केला नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीचे पैसे संपले काय, असा उलट सवाल त्यांनी अमोल मिटकरी यांना केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या तिरकस प्रश्नाला उत्तर देताना मिटकरी म्हणाले आमच्याकडे दोन नंबरचा पैसा नाही. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, व्वा…व्वा.. मिटकरी लैच बोलायला लागले. लोकांना माहीत आहे असेही पाटील यांनी म्हटले.
भाजपचे एकएक ऑफिस कोट्यावधीचे असल्याचे मिटकरी यांनी म्हटले.
गुप्त मतदान पैशांनी विकत घेता येतं हे भाजपने दाखवून दिले असल्याची चर्चा आहे.
घोडेबाजाराच्या आरोपावरुन चंद्रकांत पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे.
Web Title :- Maharashtra Vidhan Parishad Election 2021 | maharashtra vidhan parishad election result bjp president chandrakant patil on amol mitkari
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Samantha Prabhu | अभिनेत्री समंथाच्या विरोधात गुन्हा दाखल, जावं लागेल जेलमध्ये? जाणून घ्या प्रकरण
- Shama Sikander | लाल रंगाची बिकिनी घालून शमा सिकंदर उतरली स्विमिंग पूलमध्ये, हॉट फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं ‘तापमान’
- LPG Cylinder | एलपीजी सिलेंडर बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देतंय, जाणून घ्या स्कीम