Maharashtra Vidhan Parishad Election | ‘शिवसेनेचा एक उमेदवार शंभर टक्के पडणार’ – आमदार रवी राणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Vidhan Parishad Election | विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election) आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. एक एक मतांची जुळवाजुळव करण्याचे काम पक्षाकडून केले जातेय. आघाडीकडून एकून सहा उमेदवार तर भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत. यात कोण बाजी मारणार हे संध्याकाळी स्पष्ट होईल. अशातच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
“शिवसेनेचा (Shivsena) एक उमेदवार शंभर टक्के पराभूत होणार,” असं भाकीत रवी राणा यांनी केलं आहे. “राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांना जी मतं मिळाली, ती फक्त एकनाथ शिंदे यांच्या मेहनतीमुळे मिळाली आहेत. पण आज एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून शिवसेनेने ज्याप्रकारे विधान परिषद निवडणुकीची मांडणी केली आहे. ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार शंभर टक्के पडणार आहे. मागील ५६ वर्षात जे घडलं नाही, असा धक्का शिवसेनेला विधान परिषदेत बसणार आहे. तसेच भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील.” (Maharashtra Vidhan Parishad Election)
पुढे बोलताना रवी राणा म्हणाले, “विधान परिषदेत मी भाजपाला मतदान करू नये,
म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आपल्यावर दबाव टाकत आहेत,
असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, त्यासाठी ठाकरे यांनी मुंबई आणि अमरावतीचे पोलीस आपल्या घरी पाठवले होते.
पण मी घरी नसल्याने पोलीस मला अटक करू शकले नाहीत.”
Web Title :- Maharashtra Vidhan Parishad Election | shivsena one candidate will defeat 100 percent statement by ravi rana mlc election 2022
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update