शिवसेना-भाजपचे उमेदवार जाहीर, नाराज कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युतीची घोषणा केल्यानंतर आज भाजपने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर शिवसेनेने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली. दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षामध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. आपल्या नेत्याला उमेदवारी जाहीर झाली नसल्याने नाराज कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे हत्यार उपसले असून उमेदवारी मिळालेल्या नेत्याचे काम करणार नसल्याचे निर्णय घेतला आहे.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमध्ये विद्यमान 11 आमदरांचे तिकीट कापले आहे. तर काही विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा न करता त्यांना गॅसवर ठेवले आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये विद्यमान आमदांना पुन्हा उमेदवारी जाहिर केली आहे. तर शिवसेनेने अनेक आयारामांना उमेदवारी दिल्याने अनेक इच्छूक नेते आणि त्यांच्या कार्य़कर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीवर्धन विधानसभेमध्ये विनोद घोसाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रेवश केलेल्या अवधूत तटकरे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

नागपूर दक्षिणमधून मोहन मेटे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने या ठिकाणी इच्छूक असलेले आणि विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. पक्षाने माझे तिकीट का कपाले याचे उत्तर द्यावे असे म्हणत कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने याठिकाणी भाजपकडून इच्छूक असलेले भाजप नेत्यांकडून नाराजी व्यक्त करत पक्षाकडे राजीनामे देण्याची तयारी दाखवली आहे.

लोहा मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर यांनी आपला मुलगा प्रविण चिखलीकर याच्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने चिखलीकर आणि त्यांच्या कार्य़कर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रतापराव चिखलीकर हे नुकतेच भाजपमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली होती.

भाजपने तिकीट कापलेले विद्यमान आमदार

नवापूर – भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यमान आमदार सुरुपसिंग नाईक यांचे तिकीट कापले आहे.

अर्णी – संदीप प्रभाळकर धुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार राजू तोडसम यांचे तिकीट कापले आहे.

मुखेड – तुषार राठोड यांना उमेदावरी देण्यात आली आहे तर विद्यमान आमदार गोविंद राठोड यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

विक्रमगड – हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यमान आमदार विष्णू सावरा यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

मुलंड – मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आले आहे तर विद्यमान आमदार सरदार तारा सिंग यांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

माजलगाव – रमेश आडस्कर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

पुणे कॅन्टोन्मेट- सुनिल कांबळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तर विद्यमान आमदार दिलीप कांबेळे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

शिवाजीनगर – सिद्धीर्थ शिरोळे यांना उमेदवारी देणयात आली आहे. तर विजय काळे यांचा पत्त कट करण्यात आला आहे.

कोथरुड – चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

नागपूर दक्षिण – मोहन मेटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

कसबा – मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणचे विद्यमान आमदार गिरीष बापट यांनी लोकसभेची निवडणूक लढवली असून ते विजयी झाले आहेत.

Visit : policenama.com