भाजप पुन्हा शिवसेनेशिवाय लढणार ?, BJP चा ‘मास्टर’ प्लॅन ‘रेडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जागावाटपात शिवसेनेला शह देण्यासाठी रणनिती आखण्यास सुरु केली आहे. कमी जागा घ्यायला शिवसेना तयार न झाल्यास विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भाजपने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपची रणनीती –

भाजपने जिंकलेल्या 122 आणि शिवसेनेने जिंकलेल्या 63 जागा अशा 185 जागा वगळून उरलेल्या जागांपैकी निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेण्याचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला जेमतेम 100 ते 115 जागा देऊन इतर जागा भाजप आणि मित्रपक्षांना मिळाव्यात याबाबत भाजप आग्रही आहे. तर लोकसभा निवडणुकांच्या वेळी विधानसभा निवडणुकीत निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेण्याबाबतचे सूत्र ठरले असून शिवसेना यावरच ठाम आहे. कमी जागांवर लढण्यासाठी शिवसेना तयार न झाल्यास विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भाजपने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. मित्रपक्षांना काही जागांमध्ये ग्रामीण भागांबरोबरच मुंबईतील जागा देण्याचा भाजपचा विचार आहे.

मित्रपक्षांच्या मागण्या –

मागच्या विधानसभेला 6 जागा लढविणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने यावेळी 57 जागांची मागणी केली आहे. याशिवाय शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांनीही मागच्यापेक्षा दुपटीने जागा मागितल्या असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान –

युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नागपूर येथे बोलताना केले होते. जुने समीकरण आता योग्य ठरणार नाही व त्याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर जागावाटपाचा अधिकार केवळ मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हंटले होते. जागावाटपाच्या चर्चेत आपण मुख्यमंत्री व अमित शहा यांच्याशिवाय कोणालाही गांभीर्याने घेत नाही हे उद्धव ठाकरे यांनी सूचित केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –