निवडणूकीनंतर देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री : अमित शहा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अद्याप भाजप-शिवसेना यांचे जागावाटपावरून घोडे अडले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे ‘कलम 370‘ मुद्यावर अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आज भाजपने प्रचाराचा नारळ फोडला. या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले. निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा उल्लेख अमित शहा यांनी केला. त्यामुळे राज्यात युती होवो अगन न होवो राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे पुन्हा देवेंद्र फणवीस यांच्या हातात राहतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

कलम 370 वरून बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवर निषाणा साधला म्हणाले. कलम 370 काश्मीरात रक्तपात होईल असे काँग्रेस बोलत होते. मात्र, 5 ऑगस्टपासून ते 22 सप्टेंबर पर्यंत एकही गोळी चालवली नाही. तसेच एकही मृत्यू झाला नसल्याचे अमित शहा यांनी सांगितले. कलम 370 वरून जे बोलत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसवर निषाणा साधताना अमित शहा म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमूक झाले तर आम्ही जूंकू, तमूक नाही झाले तर आम्ही जिंकू, असे गणित मांडत आहेत. काहीह झाले तरी भाजप पक्षाचा निश्चित आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास अमित शहा यांनी बोलून दाखवला. पुलवामा सारखा अतिरेकी हल्ला झाला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर निश्चित आहे असे शरद पवार म्हणाले होते.

Visit :- policenama.com