वरळी : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळीमधून 67672 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या सुरवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर होते.
वरळी मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होती. या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही निवडणूक लढवत होते. मनसेने मात्र या मतदार संघातून उमेदवार दिला नव्हता. आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याऐवजी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी दिली होती.
वरळी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 2009 ची निवडणूक वगळता 1990 पासूनच्या सहा निवडणुकीत इथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे. 2014 रोजी या मतदारसंघात 55.75 टक्के लोकांनी मतदान केलं होतं तर यावेळी ही टक्केवारी 50.20 वर आली असल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत 5.55 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –