पिंपरीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे 19 हजार 618 मतांनी विजयी

शिवसेनेच्या चाबुकस्वार यांचा पराभव

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ६१८ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांना पराभवाची धूळ चारत मागील पराभवाचा वचपा काढला आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी होती. पिंपरीत ५०.१७ टक्के मतदान झाले आहे. १ लाख ७६ हजार ९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.

बालेवाडीतील मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीद्वारे पिंपरीच्या मोजणीला सुरुवात झाली. ४९९ टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरु झाली. या मतदार संघात ३९९ केंद्र आहेत. प्रत्येक टेबलवर २० केंद्र याप्रमाणे २० टेबलांवर मतमोजणी झाली. मतमोजणीच्या २० फेर्‍या झाल्या. पहिल्या सहा फेरीअखेर गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. मात्र, सातव्या फेरीपासून अण्णा बनसोडे यांनी जादुई आघाडी घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी टिकवून ठेवत बनसोडे यांनी गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी, मित्र पक्ष आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Visit : Policenama.com