30 हजाराच्या मताधिक्क्याने भाजपाच्या विद्यमान आमदाराचा पराभव

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने पाठींबा दिलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख 30 हजार 373 चे मताधिक्याने विजयी झाल्याने संपूर्ण मतदार कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आहे. शंकरराव गडाख यांना एकूण मते 1,15,863 पडली तर बाळासाहेब मुरकुटे एकूण मते 85490 पडली आहेत.

नेवासा मतदार संघात भाजपचे बाळासाहेब मुरकुटे व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांच्यात सरळ लढत झाली होती. मतमोजणी मध्ये पहिल्या फेरी पासूनच शंकरराव गडाख यांनी मतांची आघाडी घेतली ती शेवट पर्यंत वाढतच गेली.तालुक्यातील कोणत्याच गटात मुरकुटे यांना लीड मिळाल्याचे दिसून आले नाही.

मुळा पाटपाण्याचा प्रश्न अधिक प्रभावी ठरल्याने शेतकरी असलेल्या मतदारांनी गडाखांना या निवडणुकीत उचलून धरले आणि मतांचा अक्षरशः पाऊस गडाखांच्या बाजूने पडला.2014 मध्ये पराभव झालेल्या मतांच्या संख्ये पेक्षा 5 ते 6 पटीने अधिक मते गडाखांच्या पारड्यात पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठींबा, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्र शेखर घुले व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या गटाने केलेले प्रामाणिक काम यामुळे गडाखांच्या विजयाची वाट अधिक सुकर होऊन त्यांना हे मताधिक्य मिळाले आहे.

फेरी निहाय गडाख-मुरकुटे यांना पडलेली मते अशी…

फेरी -1
शंकरराव गडाख-6094
बाळासाहेब मुरकुटे-5596

फेरी -2 अखेर
शंकरराव गडाख-11449
बाळासाहेब मुरकुटे-10779

फेरी -3 अखेर
शंकरराव गडाख-16237
बाळासाहेब मुरकुटे-16230

फेरी -4 अखेर
शंकरराव गडाख-21996
बाळासाहेब मुरकुटे-21228

फेरी -5 अखेर
शंकरराव गडाख-28083
बाळासाहेब मुरकुटे-25492

फेरी -6 अखेर
शंकरराव गडाख-33577
बाळासाहेब मुरकुटे-30552

फेरी -7 अखेर
शंकरराव गडाख-39672
बाळासाहेब मुरकुटे-35246

फेरी -8 अखेर
शंकरराव गडाख-46027
बाळासाहेब मुरकुटे-39581

फेरी -9 अखेर
शंकरराव गडाख-53032
बाळासाहेब मुरकुटे-42979

फेरी -10 अखेर
शंकरराव गडाख-61855
बाळासाहेब मुरकुटे-45493

फेरी -11 अखेर
शंकरराव गडाख-68801
बाळासाहेब मुरकुटे-4830

फेरी -12 अखेर
शंकरराव गडाख-75902
बाळासाहेब मुरकुटे-51586

फेरी -13 अखेर
शंकरराव गडाख-82337
बाळासाहेब मुरकुटे-55174
13 व्या फेरीअखेर 27163 मतांनी शंकरराव गडाख आघाडीवर

फेरी 14 अखेर
शंकरराव गडाख – 4952 (87289)
बाळासाहेब मुरकूटे -3890 (59064)
शंकरराव गडाख – 28225 मतांनी पुढे

फेरी 15 अखेर
शंकरराव गडाख – 4462(91759)
बाळासाहेब मुरकूटे -5653 (64717)
शंकरराव गडाख – 27034 मतांनी पुढे

फेरी -16 अखेर
शंकरराव गडाख-96776
बाळासाहेब मुरकुटे-70945
16 व्या फेरीअखेर 25831 मतांनी शंकरराव गडाख आघाडीवर

फेरी 17 अखेर
शंकरराव गडाख – 6332 (103108)
बाळासाहेब मुरकूटे -4691(75636)
शंकरराव गडाख – 27472 मतांनी पुढे

फेरी -18 अखेर
शंकरराव गडाख-109348
बाळासाहेब मुरकुटे-80553
18 व्या फेरीअखेर 28795 मतांनी शंकरराव गडाख आघाडीवर

फेरी -19 अखेर
शंकरराव गडाख-114110
बाळासाहेब मुरकुटे-84790
19 व्या फेरीअखेर 29320 मतांनी शंकरराव गडाख आघाडीवर

शेवटची फेरी 20 अखेर
शंकरराव गडाख(क्रांतिकारी शेतकरी पक्ष व राष्ट्रवादी पाठींबा) – 1753(एकूण मते- 1,15,863)
बाळासाहेब मुरकुटे(भाजप) – 700(एकूण मते- 85490
शंकरराव गडाख – 30373 मतांनी विजयी

Visit : Policenama.com