हडपसरमध्ये भाजपच्या योगेश टिळेकरांचा पराभव, राष्ट्रवादीचे चेतन तुपे ‘एवढया’ मतांनी विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे 2800 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. मतदार संघात तिरंगी लढत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे यांच्या उमेदवारीने हडपसर मतदार संघात चांगलीच रंगत आली होती.

गेल्या अनेक दिवसांपासुन हडपसर मतदार संघाची पुण्यात चांगलीच चर्चा चालू होती. सन 2014 मध्ये भाजपचे योगेश टिळेकर हे निवडून आले होते. त्यांचा यंदा चेतन तुपे यांनी पराभव केला आहे. सन 2009 मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर या मतदार संघातून निवडून आले होते. यंदा शिवसेेनेने हा मतदार संघ भाजपाकडे मागितला होता. मात्र, शिवसेनेच्या पदरी निराशा आली. हडप्सर मतदार संघात अखेर राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांचा विजय झाला आहे.

Visit : Policenama.com