हडपसर मधून चेतन तुपे 19 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर

हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे निकाल हाती यायला लागले आहेत. पुण्यातील हडपसर मतदार संघातून विद्यमान भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांचे आव्हान होते. मतमोजणीच्या नवव्या फेरीनंतर चेतन तुपे हे 19 हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

विशेष म्हणजे मनसेच्या वसंत मोरेंनी या आधी आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात अनेकदा आंदोलने केली होती. राज ठाकरेंनी देखील वसंत मोरे यांच्यासाठी मोठी सभा घेतली होती. राष्ट्रवादीने देखील या मतदार संघात चेतन तुपे यांना उमेदवारी देऊन ही लढत तिरंगी केली होती. चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते.

ज्या ज्या वेळी हडपसरमध्ये तिरंगी लढत झाली आहे त्या वेळी विद्यमान आमदारालाच फायदा झाल्याचे दिसून आले होते. मात्र नवव्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर आहेत.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.

Visit : Policenama.com