पुणे : कसब्यातून भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक 28196 मतांनी विजयी, जाणून घ्या इतर 10 उमेदवारांना किती पडली मते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षापासुन भाजपकडे असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघात यंदा भाजपकडून महापौर मुक्ता शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्यात आली होती. कसब्यातून गतवेळी गिरीश बापट यांनी निवडणूक लढवली होती. यंदा ते लोकसभेला पुणे मतदार संघातून निवडून आले. त्यामुळे भाजपने मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली होती. टिळक यांनी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांचा तब्बल 28196 मतांनी पराभव केला आहे. दरम्यान, या मतदार संघातील तब्बल 2528 जणांनी नोटाचा वापर केला आहे.

कसबा मतदार संघ –
1. अजय शिंदे (मनसे) – 8284
2. अरविंद शिंदे (काँग्रेस) – 47296
3. मुक्ता शैलेश टिळक (भाजप) – 75492
4. तोसिफ अब्बास शेख (संभाजी ब्रिगेड) – 594
5. अल्ताफ करिम शेख (अपक्ष) – 196
6. धनावडे विशाल गोरख (अपक्ष) -13989
7. नवनाथ गेनुभाऊ रणदिवे (अपक्ष) – 161
8. नाईक स्वप्नील अरूण (अपक्ष) -146
9. युवराज भुजबळ (अपक्ष) – 1072
10. राजेश सिसराम जान्नू (अपक्ष) -307
11. नोटा – 2528

एकुण मतदान 150069

Visit : Policenama.com