बीड : पोलीसनामा ऑनलाइन – संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि युवानेता संदीप क्षीरसागर हे विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे सख्ख्ये काका आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा 1786 मतांनी पराभव केला आहे.
बीड जिल्हयातील बीड आणि परळी विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. परळीमधून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपाच्या उमेदवारी आणि विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. मतांचा विचार केला तर जयदत्त क्षीरसागर यांचा केवळ 1786 मतांनी पराभव केला आहे मात्र तो संदीप क्षीरसागर यांचा हा मोठा विजय मानला जात आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –