सुमन पाटील यांची विजयाकडे वाटचाल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – तासगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुमन पाटील या पहिल्या काही फेऱ्यात तब्बल २५ हजार मतांची आघाडी घेतली असून त्या विजयाकडे वाटचाल करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पाटील यांच्याविरुद्ध शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांच्यात लढत होती. पण, सुमन पाटील यांनी खूप मोठी आघाडी घेतली आहे. अजितराव घोरपडे यांना खूपच कमी प्रतिसाद मतदारांनी दिला असल्याचे मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीतून दिसून येत आहे.

माजी गृहमंत्री पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुमनताई पाटील या निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्या सहानभुतीवर निवडून आल्या असा दावा निवडणुक प्रचार करण्यात आला होता. पण तासगाव अजूनही पाटील यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसून येत आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.

Visit : Policenama.com