‘विश्वजीत कदम’ मोठ्या मताधिक्याने ‘विजयी’, शिवसेनेच्या ‘संजय विभुते’ यांचा 1 लाखापेक्षा जास्त मतांनी ‘पराभव’

सांगली : पोलीसनामा ऑनालाइन – विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगाव (सांगली) या मतदार संघात विजयी होत काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एका जागेवर विजय मिळवून दिला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय विभुते यांना उमेदवारी घोषित केली होती. प्रचारादरम्यान विश्वजीत कदम यांनी जोरदार ताकद पणाला लावली होती. विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगाव मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. विश्वजीत कदम यांना 1 लाख 56 हजार 44 इतकी मतं होती, तर शिवसेनेचे संजय विभुते यांना 12 वाजता फक्त 5047 मतं होती. त्यामुळे विश्वजीत कदम यांनी ही निवडणूक एकतर्फी विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.

विश्वजीत कदम यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी हा मोठा विजय मानला जात आहे. शिवसेनेचा पत्ता पलूस कडेगाव मतदार संघात न चालल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे विश्वजीत कदम पहिल्यापासूनच आघाडीवर होतो. या कारणाने विश्वजीत कदम यांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली होती.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस च्या पतंगराव कदम यांनी 1 लाख 12 हजार 523 एवढी मते घेत विजय मिळवला. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजप चे पृथ्वीराज देशमुख होते. त्यांना 88 हजार 489 मते मिळाली. आणि त्यांचा 24 हजार 034 मतांनी पराभव झाला. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेना चे प्रवीण गोंदिल, चौथ्या स्थानावर अपक्ष चे संदीप धनपाल आणि पाचव्या क्रमांकावर मनसे चे अंकुश पाटील होते.

Visit : Policenama.com