अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ‘हे’ दिग्गज विजयाच्या उंबरठयावर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बारामती विधानसभा मतदार संघातून 1 लाख हून अधिक मतांनी पुढे आहेत. भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांचा पराभव जवळपास निश्चितच आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे देखील विजयाच्या उंबरठयावर आहेत.

शहादा – भाजपचे राजेश पडावी विजयी
सिंदखेडा – भाजपचे जयकुमार रावळ विजयी
परळी – राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 21 हजार मतांनी आघाडीवर (निर्णायक ठरणार)
बारामती – राष्ट्रवादीचे अजित पवार 1 लाख मतांनी आघाडीवर (विजयाच्या जवळ)
तासगांव – राष्ट्रवादीच्या सुमन आर. पाटील 50 हजार मतांनी आघाडीवर (विजयाच्या जवळ)
इस्लामपूर – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 50 हजार मतांनी आघाडीवर (विजयाच्या जवळ)
परभणी – शिवसेनेचे राहून पाटील 40 हजार मतांनी आघाडीवर
मानखुर्द – समाजवादी पार्टीचे आबु आझमी 44 हजार मतांनी आघाडीवर
कोल्हापूर – भाजपचे दोन्ही उमेदवार पराभवाच्या छायेत (सुरेश हळवणकर, अमल महाडिक – पराभवाच्या छायेत)
औसा – भाजपचे अभिमन्यू पवार 13 हजार मतांनी आघाडीवर

11.55 am

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.

Visit : Policenama.com