विधानसभा 2019 : ‘या’ अटी आणि शर्तींवर शिवसेना कमी जागांवर लढण्यास तयार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेना युतीला घेऊन अनेक तर्क समोर येताना दिसले. शिवसेनेने 13 ते 14 मंत्रिपदे मिळावीत असा प्रस्ताव भाजपला दिल्याची माहिती आहे. शिवसेना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदे वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आहे असे समजत आहे.

शिवसेनेला दोन तीन मंत्रिपदे देऊन 122 ते 124 जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु 126 पर्यंत जागा आणि मंत्रिपदे वाढवून द्यावीत यासाठी शिवसेना आग्रही आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात अरविंद सावंत हे एकमेव शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे तुलनेने काही महत्तवाचे खाते आहेत. दरम्यान शिवसेनेच्या प्रस्तावाला अद्याप भाजपचा होकार आलेला नाही अशी माहिती आहे. दोन्ही पक्षाच्या जागावाटपाबाबत सोमवारीही चर्चा झाली.

असे म्हटले जात आहे की, भाजप-सेना युतीचा फैसला दिल्ली होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जातील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 26 सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याने त्या दिवशी युतीची घोषणा होईल असे बोलले जात होते. परंतु शहांचा दौरा रद्द झाला आहे.

 

Visit : Policenama.com