50-50 चं ठरलं, पण… देवेंद्र फडणवीसांची उध्दव ठाकरेंना नवी ‘ऑफर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे राज्यातल्या जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असतानाही सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना नवा प्रस्ताव दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचे समान वाटप व्हावे अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. त्यामुळे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे. मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहिल. मात्र, मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ, असे आश्वासन नव्या प्रस्तावात देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रीपदावरील आपला अडीच वर्षांचा दावा सोडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात शिवसेनेला पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये दोन अतिरिक्त मंत्रिपदं त्यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रीपद दिली जावीत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जावी. तसेच राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचे 50 टक्के नियंत्रण असावे अशा मागण्या शिवसेनेकडून करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना हा नवा प्रस्ताव देण्यात आला असल्याचे समजतेय.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या