‘बाप बापचं असतो’च्या बॅनरबाजीमुळं राजकारण तापलं

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष बनल्याचं स्पष्ट झालं. मात्र, सन 2014 च्या तुलनेत पक्षाच्या जागा कमी झाल्या आहेत. भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं नसल्यानं त्यांच्या मनसुब्यांना चांगलाच हादरा बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरात भाजपला खात देखील उघडता आलं नाही. त्यामुळे कोल्हापूर भाजपमुक्त झालं. त्यानंतर राष्ट्रवादीनं कोल्हापूरामध्ये ‘बाप बापचं असतो’ अशी बॅनरबाजी केल्यानं राजकारण चांगलच तापलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा फोटो आणि त्यापुढं ‘बाप बापचं असतो’ असा मजकूर बॅनरवर आहे. सन 2014 च्या निवडणूकीत कोल्हापूरमधून भाजपचे 2 आमदार निवडुन आले होते. यंदा त्यांनाच पक्षानं उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आमदार सुरेश हळवणकर आणि अमल महाडिक हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले. त्यांना अनुक्रमे काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी करून बाहेर पडलेले प्रकाश आव्हाडेंनी पराभूत केलं. सन 2014 मध्ये भाजप-शिवसेना महायुतीनं कोल्हापूर जिल्हयातील 10 जागांपैकी 8 जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र केवळ दोनच जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. चंद्रकांत पाटील यांनी निवडणुक प्रचारादरम्यान शरद पवारांबद्दल अनेक विधानं केली होती. त्यामुळेच की काय राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी कोल्हापूरात बाप बापचं असतो अशी बॅनरबाजी केली आहे. एकंदरीत या बॅनरबाजीमुळे राजकारण चांगलच तापलं आहे.

Visit : policenama.com