राष्ट्रवादीनं भाजपाला दिलं ‘हे’ ओपन ‘चॅलेंज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अधिक संख्याबळ येऊन देखील भाजपने अद्याप सत्ता स्थापन केलेली नाही कारण भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही आणि त्यासाठी भाजपला शिवसेनेला सोबत घ्यावे लागणार आहे. मात्र, भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला सुनावत आमचे आमदार फोडूनच दाखवा असे आव्हान दिले आहे.

भाजपकडून फोडाफोडीचे राजकरण केले जाऊ शकते. यासाठी राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनेचे देखील आमदार फोडले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याला राष्ट्रवादी चोख प्रतिउत्तर देईल तसेच ज्या पक्षाचा आमदार फोडला आहे त्या पक्षाला इतर सर्व मदत करतील आणि त्या जागी पुन्हा आमचा उमेदवार निवडणूक आणतील असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

निवडणुकीआधी भाजपने मोठ्या प्रमाणावर आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातील उमेदवारांना आपल्या पक्षात घेतले होते याचाच दाखला देऊन जयंत पाटील यांनी सांगितले की, त्या सर्व उमेदवारांना जनतेने नाकारले याची आठवण देखील यावेळी जयंत पाटील यांनी भाजपला करून दिली.

साताऱ्यात उदयनराजे यांनी आपल्या खाजदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवली आणि पराभव पत्करला हे सर्वांनी पहिले आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सातारा पोटनिवडणुकीचा दाखला देत उदयनराजे होण्याच्या भीतीने आमदार फुटण्याचा निर्णय घेणार नाहीत अशी शक्यता वर्तवली होती.

Visit : Policenama.com