शिवसेनेला धक्का ? पाठिंब्याबाबत काँग्रेसची अतिशय ‘सावध’ भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभेचा निकाल लागून 11 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहत आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेमध्ये मदत करावी असे मत अनेक काँग्रेस नेत्यांचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसे संकेत दिलेले आहेत. मात्र याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल नाही अशी चर्चा सुरु आहे.

शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान चर्चा न होता दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले गेले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही. तर शिवसेना खासदार वारंवार संजय राऊत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे म्हणत आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आवश्यकता आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची यांची भेट घेतली. मात्र काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून दूर होईल. मात्र याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला सहन करावे लागतील, अशी भूमिका सोनिया यांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसची ही भूमिका शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Visit : Policenama.com