टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय, CM ठाकरेंचा PM मोदींना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचं नाव बदलण्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. ते म्हणाले, टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असं बदलण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसताना तुम्हाला लाज वाटत नाही ? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

‘सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघतोय असा भास झाला’
सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाच्या स्टाईलवरुन यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोमणा मारला. मी मझ्या केबिमनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट… आणि शेवट असा केविलवाणा वाटला की कोणी किंमत देत का किंमत ! सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश… देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार ? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

भाषणातील काही मुद्दे
– मराठी भिकारी आहे का ?… छत्रपतींची भाषा भिकारी असू शकत नाही… छत्रपती नसते तर आम्ही सोडा, दिल्लीत बसलेत ते तरी असते का ?
– मराठीला अभिजात भाषेचा दर्जा…
– खोटेपणा करणं रक्तात नाही… बंद दाराआडही कधी खोटेपणा केला नाही… महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवला नाही…
– सावरकरांना भारतत्न द्या, दोन वेळा पत्रं गेली… कोण देतं पत्र… आमदारांची समिती देते का ?
– औरंगाबादचं संभाजीनगर जरुर करु, पण त्याच्याआधी मला ही पण तारीख पाहिजे.. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा…