उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी महादेव जानकरांनी केलं पंकजा मुंडेंचे ‘औक्षण’

बीड (परळी) : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे. आज परळीतून राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी पंकजा मुंडे यांना त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे, बहिण खासदार प्रितम मुंडे, यशश्री मुंडे आणि मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी औक्षण केले. यावेळी त्यांचे पती अमित पालवे देखील उपस्थित होते.

यात चर्चा झाली ती पकंजा मुंडे यांचे मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी पकंजा मुंडे यांच्या केलेल्या औक्षणाची. निवडणूक अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडेना कुटूंबियांकडून ओवाळण्यात आले. यावेळी महादेव जानकर देखील उपस्थित होते. त्यांनी देखील पकंजा मुंडे यांचे या शुभक्षणी औक्षण केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असताना त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले, यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत महादेव जानकर देखील उपस्थित होते.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी गणपती मंदिर, वैद्यनाथ मंदिर आणि गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर मोठी फेरी काढून त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या.

Visit : Policenama.com